Friday, September 26, 2014

Poems inspired by "second Spring" written by Sandhya Jane

मृगजळ

एक सुख तुझ्या आभासाचे तू नसताना मन रिझवण्याचे एक दु;ख तु नसण्याच तु नाहिस म्हणुन जगत जगत मरण्याच एक सुरवात तुझ्या सोबतीची वाट नेहमीचीच तुझ्या आठवणीची एक अंत दुःखाच्या धडींची सुखाच्या प्रतिक्षेची मोक्षाच्या क्षणाची एक मृगजळ तुझ्या सहवासाचे डोळ्यांच्या दोषाला नशिबा दुषावण्याचा एक अस्तित्व अबोल स्वीकारलेले मोहाच्या क्षणांना दुर्दैवात मांडलेले


------------
तू आहेस प्रेमाचा प्रसाद याला चूक म्हणू नकोस कि अपराध प्रेमाच्या पूजेचा मिळालेला प्रसाद नाही रे बाळा असा अंकुरत जीव खऱ्या प्रेमाचा तू आहेस प्रमाद एका वळणावर सुटला ताबा मनाचा बांध नकळत तुटला आजवर होता अंकुश मनावर मोहाच्या क्षणात जीव पाघळला त्या एका फसव्या क्षणात उदरात मायेने किमया केली रुजवून तुझा अंकुर उदरात मातृत्वाची मजला चाहूल दिली धूतकारले जगाने देत दुषणे मजसी होते परी प्रेम साकारणे लोकांनी मानले त्यास अवलक्षण मजसाठी होते ते देवाचे देणे विरोधाला धीराने देत उत्तरे विसरून सारे व्रत घेतले तू आहेस माझा आधार तुजसाठी आता जीवन उरले गिरीश २३.७.२०१४

-----

अचानक रुंजून कानात वाऱ्याने मोहळ उठविला गुलबक्षीचा गुलाबी मोहर माझ्या अंगावर सांडीयला

My friends, Mr Girish Morje, who inspired by novel, wrote these poems in Marathi....

Thanks a lot, Girish for such lovely poems.

Will translate them in English shortly!

-- Sandhya Jane


No comments:

Post a Comment